महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे 'रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:47 PM2020-01-23T12:47:59+5:302020-01-23T12:48:41+5:30

तसेच या अधिवेशनात सर्वांची उत्सुकता अमित ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाकडे लागली होती.

For the security of women, MNS will set up a 'Raksha Bandhan Empowerment Team' in Taluka level | महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे 'रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन करणार

महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे 'रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन करणार

Next

मुंबई - मनसेच्या १४ वर्षाच्या स्थापनेनंतर पहिलचं महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात अनेक ठराव पक्षाकडून मांडण्यात येत आहे. यामध्ये महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण याचाही ठराव मांडण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचा दबलेला आवाज निडरपणे मांडण्यासाठी महिला महाराष्ट्र सैनिकांतर्फे 'मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन केलं जाणार असल्याचं ठराव मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडला. 

त्याचसोबत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पनुसार स्त्रियांना केंद्रस्थानी धरून स्त्रियांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणं गरजेचं अशी मागणी ठराव करुन करण्यात आली आहे. 

तसेच या अधिवेशनात सर्वांची उत्सुकता अमित ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाकडे लागली होती. बाळा नांदगावकर यांनी अधिवेशनात अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला, त्याला एकमताने सगळ्यांनी मंजूरी दिली. यानंतर अमित ठाकरे शिक्षणावरील ठराव मांडला.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करणार आहे. मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हि शिक्षण परिषद आयोजित करण्यात येईल अशी माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. 

या अधिवेशनात सांस्कृतिक महाराष्ट या विषयाचा ठराव अभिनेते संजय नार्वेकर यांनी मांडला. गडकिल्ले संवर्धन, नाट्यगृहांची दुरावस्था सुधारावी. प्रायोगिक रंगभूमी जोपासणं ती वृद्धिंगत करणं गरजेचं. मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान मिळालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशा ठराव त्यांच्याकडून मांडण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या

BIG Breaking: अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला? 

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

 ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

Web Title: For the security of women, MNS will set up a 'Raksha Bandhan Empowerment Team' in Taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.