उच्च राहणीमान पाहून शेतकरीही फसले अन् ठकसेन सूर्यवंशीच्या जाळ्यात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:35+5:302021-05-07T04:06:35+5:30

नातेवाईकांनाही गंडा; कुठे मुलीच्या लग्नासाठीचे पैसे अडकले, तर कुठे जमापुंजी साेन्याचा गंडा - भाग ३ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

Seeing the high standard of living, the farmers also fell into the trap of Anthaksen Suryavanshi | उच्च राहणीमान पाहून शेतकरीही फसले अन् ठकसेन सूर्यवंशीच्या जाळ्यात अडकले

उच्च राहणीमान पाहून शेतकरीही फसले अन् ठकसेन सूर्यवंशीच्या जाळ्यात अडकले

Next

नातेवाईकांनाही गंडा; कुठे मुलीच्या लग्नासाठीचे पैसे अडकले, तर कुठे जमापुंजी

साेन्याचा गंडा - भाग ३

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उच्च राहणीमान, ऑडीतून ये-जा पाहून शेतकरीही फसले आणि ठकसेन मुकेश सूर्यवंशीच्या जाळ्यात अडकले. यामुळे कुणाचे भविष्यात मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी गुंतवलेले पैसे अडकले तर कुठे वृद्धापकाळासाठी ठेवलेली जमापुंजी गमावण्याची वेळ आली. सूर्यवंशीमुळे मानसिक तणावाखाली असून, आता न्यायासाठी लढण्याची ताकदही राहिली नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुळ्यातील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आणि त्याच्या आई-वडिलांचे उच्च राहणीमान पाहून ते आपली फसवणूक करणार नाहीत, असे वाटले होते. पाच तोळे सोन्यावर गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष त्याने दाखवले. सुरुवातीचे तीन महिने गुंतवलेल्या रकमेप्रमाणे हफ्ते मिळू लागले. त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास आणखीच वाढला. एकाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे दुप्पट होऊन मिळतील, जेणेकरून मुलीचे थाटात लग्न करता येईल, या आशेने गुंतवणूक केली. तर सैन्यदलातील एका निवृत्त जवानाने त्याची जमापुंजी गुंतवली. काहींनी कर्ज घेऊन पैसे गुंतवले.

त्यानंतर सूर्यवंशी ‘नॉट रिचबेल’ झाला. दुबईला पसार होण्यापूर्वीपर्यंत तो सगळे पैसे मिळणार असल्याचे आश्वासन देत होता. मात्र, नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्याचे आई-वडीलही गायब आहेत. तो रोख स्वरुपात पैसे घेत असल्यामुळे अनेकांकडे पुरावे नाहीत. नातेवाईकांच्या ओळखीतून व्यवहार केल्यामुळे लेखी करारही नाही. त्यामुळे सध्या कोर्टकचेरीचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे पुढे येण्याची भीती वाटत असल्याचे धुळ्यातील या शेतकऱ्याने सांगितले.

* ६०हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक?

सूर्यवंशीने धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील ६०हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या यापैकी २० ते २५ जण संपर्कात आहेत. मात्र, सगळेच मानसिक धक्क्यात आहेत. कोरोनामुळे अनेकांवर दुसऱ्यांच्या शेतात जावून काम करण्याची वेळ आल्याचे धुळ्यातील शेतकऱ्याने सांगितले.

* कठोर कारवाई होणे गरजेचे

सूर्यवंशीविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तक्रारदारांनीही पुढे यायला हवे, जेणेकरून दुसरा सूर्यवंशी तयार हाेऊन काेणाची फसवणूक करणार नाही, असे याप्रकरणी तक्रार दाखल केलेल्या सत्यानंद गायतोंडे यांनी सांगितले. कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये एजंट म्हणून कार्यरत असलेल्या गायतोंडे यांच्या प्रयत्नामुळे सूर्यवंशी पोलिसांच्या हाती लागला. गायतोंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचीही ६० ते ७० लाखांना फसवणूक झाली आहे.

.....................

Web Title: Seeing the high standard of living, the farmers also fell into the trap of Anthaksen Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.