दोघांना अटक : मुख्य सूत्रधार ज्वेलर्समध्ये काम करणारा नोकर
मुंबई : घडलेले गुन्हे आणि त्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासावर आधारित वास्तवदर्शी मालिका पाहून परळ, ना. म़ जोशी मार्गावरील ज्वेलर्स लुटणा:या त्रिकुटापैकी दोघांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ज्वेलर्समध्ये दोन वर्षापूर्वी काम करणारा नोकर असून, त्याचा शोध सुरू आहे.
प्रकाश मेगवाल (2क्) आणि रमेशकुमार मेगवाल (2क्) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. तर o्रावण चौहान हा या दुकानात दोन वर्षापूर्वी काम करणारा नोकर फरार आहे.
24 नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास ना. म. जोशी मार्गावरील प्रकाश ज्वेलर्समध्ये प्रकाश, रमेश दागिने पाहण्याच्या निमित्ताने शिरले. थोडय़ाच वेळात त्यांनी दडवलेली शस्त्रे बाहेर काढून दुकानातल्या नोकरला धमकावले. दोघांचे हातपाय बांधले. त्यानंतर o्रावणने दुकानात एन्ट्री केली. या दुकानात काम केल्याने खरे दागिने कुठे आहेत याची त्याला इत्थंभूत माहिती होती. त्यानुसार तिघांनी सुमारे 2क् तोळ्यांचे सोन्याचे दागिने व तीन किलो चांदी असा सुमारे सहा लाखांचा ऐवज चोरून पळ काढला. जाताना या तिघांनी सीसीटीव्हींचे चित्रण रेकॉर्ड करणारे यंत्रही सोबत नेले.
या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना प्रकाश व रमेश यांची माहिती मिळाली.
त्यानुसार एपीआय नितीन पाटील, चंद्रकांत दळवी, सुनील माने, पोलीस नाईक कोळी, शिपाई महेश मोहिते आणि पथकाने मालाड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
या टोळीचा म्होरक्या o्रावणने टीव्हीवरील मालिका पाहून लूटमारीचा कट आखल्याची माहिती समोर आली. लूटमारीनंतर पोलीस आपल्यार्पयत पोचू नयेत, यासाठीही त्याने विशेष खबरदारी घेतली होती. दीड महिन्यात या तिघांनी एकमेकांसोबत बोलण्यासाठी तब्बल 23 सिम कार्डे व 23 मोबाइल बदलले.