Join us

पगारासाठी जप्त केल्या गाडय़ा

By admin | Published: November 25, 2014 2:02 AM

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा जुना कचरा ठेकेदार भूमिका ट्रान्सपोर्ट, मुंबई याची कामात हलगर्जीपणा केल्याने मनपाने हकालपट्टी केली.

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा जुना कचरा ठेकेदार भूमिका ट्रान्सपोर्ट, मुंबई याची कामात हलगर्जीपणा केल्याने मनपाने हकालपट्टी केली. त्यानंतर कंपनीने कर्मचा:यांचा दोन-तीन महिन्यांचा पगार न दिल्याने त्यांनी कंपनीच्या चालू गाडय़ा जप्त करून शहरातील रस्त्यावर ठेवल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणचे रस्ते अडले आहेत.
भिवंडी महानगरपालिकेने भूमिका ट्रान्सपोर्ट मुंबई या कचरा ठेकेदाराने पालिकेने शहरातील कचरा उचलण्याऐवजी खाजगी मालकाच्या जागेतील कचरा उचलून त्याचे बिल मनपाच्या खात्यावर टाकलेले प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर कामात हलगर्जीपणा केल्याची नागरिकांमधून ओरड झाल्याने त्याची मनपा प्रशासनाने हकालपट्टी केली. परंतु या कंपनीच्या वाहनांवर काम करणा:या चालकांना व इतर कर्मचा:यांना पगार न दिल्याने त्यांचे नुकसान होऊन ते बेरोजगार झाले. त्या रागात या कर्मचा:यांनी कंपनीच्या गाडय़ाच आपल्याकडे ठेऊन घेतल्या. मात्र त्या गाडय़ा शहरातील रस्त्यांवर उभ्या ठेवल्याने रस्त्यांची अडवले गेले आहेत. या सडलेल्या गाडय़ांवर परिसरांतील लहान मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मनपा स्वच्छता विभागाच्या उपायुक्त विजया कंठे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भूमिका कंपनीने शहरात ठिकठिकाणी उभ्या करून घाण केली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मनपामार्फत कंपनीवर 
गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)