मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेशासाठी दुसरी राज्यस्तरीय लॉटरी शनिवारी काढण्यात आली. मुंबई विभागातून ३५६ शाळांतील २०९७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. महापालिका विभागातील १५१६ विद्यार्थ्यांची तर डिव्हायडी विभागातील ५२१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. १६ जून २०१९ ते २७ जून २०१९ दरम्यान दुसºयाया लॉटरीसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरु राहणार आहे़ १७ जूनपासून याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आरटीईच्या दुसºया लॉटरीमुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. या शाळांमधील प्रवेशासाठी पालकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्रवेशासाठी ८ एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरीकाढून पहिली फेरी राबविण्यात आली.अर्जातील गुगल लोकेशनसह इतर माहितीत दुरुस्ती करण्यासाठी पालकांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. या कालावधीत बहुसंख्य पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन अर्जातील माहितीत दुरुस्ती करून घेतली व लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.मुंबई विभागातून निवड झालेल्या २०९७ विद्यार्थ्यामध्ये पहिलीच्या इयत्तेचे १६१२ विद्यार्थी आहेत. यामध्ये पालिका क्षेत्रातील ११११ तर डिव्हायडी क्षेत्रातील ५०१ विद्याथ्यंर्चा समावेश आहे. पूर्व प्राथमिकमधील ४८५ विद्याथ्यार्ची निवड दुसºया लॉटरीमध्ये झाली आहे.यामध्ये पालिका क्षेत्रातील ४६५ आणि डिव्हायडी क्षेत्रातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशाची लॉटरी लागलेल्या पालकांना नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. एसएमएस न आल्यास वेबसाईटवर एप्लिकेशन वाईज डिटेल्समध्येअर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे का ते पाहता येणार आहे.
आरटीईच्या दुसऱ्या लॉटरीत २०९७ विद्यार्थ्यांची निवड; महापालिकेचे १५७६, डिव्हायडीचे ५२१ जण पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:07 AM