Join us  

स्वीकृत सदस्यांची निवड ३१ मार्चला

By admin | Published: March 21, 2015 10:54 PM

ठाणे महापालिकेच्या पाच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदाच्या निवडीचा मार्ग ३१ मार्च रोजी खुला होणार असून यासाठी एका विशेष महासभेचे आयोजन केले आहे.

ठाणे / घोडबंदर : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या पाच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदाच्या निवडीचा मार्ग ३१ मार्च रोजी खुला होणार असून यासाठी एका विशेष महासभेचे आयोजन केले आहे. ही निवड मार्चअखेर करावी, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेच्या इच्छुक स्वीकृत नगरसेवकाला मात्र आयुक्तांनी त्याच्या शिक्षणावर बोट ठेवून निरु त्तर केले आहे. शासनाच्या अध्यादेशानुसारच ही निवड केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवकपदाबाबतचे वृत्त प्रथम लोकमतनेच दिले होते.स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या राम आणि विकास रेपाळे बंधूंनी ही निवडणूक लवकर व्हावी, यासाठी न्यायालयापासून प्रशासनापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. सुप्रीम कोर्टाचे आदेश ९ फेब्रुवारीला प्राप्त झाले होते. तसेच विभागीय आयुक्तांनीदेखील २४ फेब्रुवारीला पालिकेला पत्र देऊन पाच नामनिर्देशित सदस्यांची निवड करावी, असे कळवले होते. सुप्रीम कोर्टाने एप्रिल २०१२ मध्ये या पदासाठीची प्रक्रि या हाती घेतली होती़ त्यानुसार, २३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, शासन आदेशानुसार डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सनदी लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, मुख्याधिकारी, पालिकेचा सहायक आयुक्त, उपायुक्त, आयुक्तपदाची अनुभवी व्यक्ती आणि पाच वर्षे समाजकार्यातील पदाधिकारी यांच्यामधून हे सदस्य निवडले जाणे अपेक्षित असल्याने पेच उभा राहिला होता.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात पूर्वी झालेली प्रक्रि या रद्द करण्याचे निर्देश नसतानाही पुन्हा अर्ज मागवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर रेपाळे यांनी निवडणूक घेण्याची विनंती केली आहे़ तेव्हा निवडणूक पुन्हा घेणाऱ मात्र, शासन अध्यादेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच त्यांना तुमचे शिक्षण काय, असा सवाल केला. तुम्ही एनजीओमार्फत सदस्य होता. मात्र, मी उच्चशिक्षित आणि कोणी किती समाजसेवा केली, हे तपासूनच निवडीला शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले़ तेव्हा रेपाळे यांना मात्र त्यांचे शिक्षण किती झाले, हे अखेरपर्यंत सांगता आले नाही.याच महासभेत स्थायीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची निवड, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण, क्रीडा समाजकल्याण, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य परिरक्षण व साहाय्य, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती आदींचीही निवड या वेळी केली जाणार आहे.