बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 05:39 PM2020-12-10T17:39:42+5:302020-12-10T17:40:03+5:30

Higher Education : सिंगापूर नंतर आता अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे.

Selection of Best Employee's Daughter in American University for Higher Education | बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड 

बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड 

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - बेस्ट कर्मचारी वसाहत परळ येथे राहणारी आणि  बेस्ट कर्मचारी यांची मुलगी आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूर नंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. बेस्टचे कर्मचारी, वाहनचालक पदावर कार्य करणारे अब्दुल रजाक मुल्ला यांची मुलगी आलिया हिने अभ्युदयनगर मुंबई पब्लिक स्कुलमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण घेतल्यानंतर तीची सिंगापूर येथे २०१८ ते २०२० पर्यत पुढील शिक्षणासाठी निवड झाली होती. आलियाचे वडील अब्दुल मुल्ला यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तीने ही कामगिरी बजावली आहे. अकरावी-बारावीसाठी युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशिया या आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी निवड झाली. या ठिकाणी दोन वर्षे शिक्षण घेत गुणवत्ता सिद्ध केल्याने आलियाची निवड पुढील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये झाली आहे. या ठिकाणी ती पुढील चार वर्षे लिबरल आर्ट्स डिग्री, स्पेशलायझेशन इन सिलेक्टेड सब्जेक्टचे शिक्षण घेणार आहे.

 पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्यावत शिक्षण दिले जाते. मात्र यासाठी स्वतःही मेहनत घेणे आवश्यक असते. मी देखील यामुळेच यशस्वी झाले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थीही परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्वल यश मिळवू शकतात असे मनोगत आलिया मुल्ला हिने लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आलियाने जे यश मिळवले आहे त्याचा पालक म्हणून आम्हास अभिमान आहे. तसेच अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी उच्चशिक्षण घेण्याबाबत आलियाचा प्रवास सदैव प्रेरणादायी राहील असे आलियाची आई सुरय्या मुल्ला यांनी सांगितले.

आलियाचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

दरम्यान आलिया मुल्ला हिने मिळवलेल्या यशाबद्दल 
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तीचे कौतुक केले आहे. आलिया हिची जिद्द आणि पालिका शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच असे यश मिळत असल्याचे त्यांनी 
आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षण समितीकडून घेतल्या जाणाऱ्या महत्वकांक्षी निर्णयांचेही महत्वपूर्ण योगदान असल्याचे आदित्य ठाकरे यांनी  सांगितले.

शिवसेनेकडून सत्कार !

आलिया मुल्ला हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने तिच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. शिवडी विधानसभा व शाखा क्रमांक २०४ च्या वतीने पुढील ४ वर्षाच्या शिक्षणाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विभागप्रमुख व आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनील कोकीळ,एकनाथ सणस, राजू रावराणे, पाटणकर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Selection of Best Employee's Daughter in American University for Higher Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.