नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार या प्रकल्पबाधितांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या कंपनीला ५४ कोटींचा ठेका देण्यात आला आहे. गाढी नदीच्या बंधाऱ्याचे वाढीव काम तसेच वडघर परिसरात पायाभूत सुविधांचा विकास या कामांचा समावेश आहे. या कामांची वडघर दक्षिण आणि उत्तर अशी दोन भागांत विभागणी केली आहे. दक्षिणेकडच्या कामांचा खर्च २१ कोटी ५५ लाख तर उत्तरेकडील कामांचा खर्च ३२ कोटी ९७ लाख निर्धारित करण्यात आला आहे. यासाठी सिडकोने मागविलेल्या निविदा प्रक्रियेत खारपाटील कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा कमी किमतीने ही कामे करण्याची इच्छा व्यक्त केल्याने या कंपनीची निवड करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
विमानतळ पुनर्वसन विकासकामासाठी ठेकेदाराची निवड
By admin | Published: June 28, 2015 1:21 AM