मेट्रो-३ मार्गिकेच्या विविध कामांसाठी कंत्राटदाराची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:46 AM2019-09-18T01:46:20+5:302019-09-18T01:46:26+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेच्या सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणी रोलिंग स्टॉक सबमिटच्या स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन सेवांसाठी कंत्राट देण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेच्या सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणी रोलिंग स्टॉक सबमिटच्या स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन सेवांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. एमएमआरसीकडे आलेल्या निविदांमधून अत्यंत काटेकोरपणे निवडण्यात आलेल्या मेसर्स ब्युरो व्हेरिटास इटालिया एस.पी.ए.सोबत हा करार करण्यात आला असल्याची माहिती एमएमआरसीच्या वतीने देण्यात आली आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेवरील विविध कामांसाठी नुकतेच कंत्राट देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे. यावर एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मेट्रो मार्गाच्या सुरक्षित आणि यशस्वी चलनवलनासाठी स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन (आयएसए) अनिवार्य आहे़ मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि रोलिंग स्टॉक सबसिस्टमचे स्वतंत्र सुरक्षा मूल्यमापन सुनिश्चित वेळेत करण्याचे आमचे लक्ष्य आहे.