मुंबई - वैश्विक लाइफलॉन्ग लर्निंग प्लॅटफॉर्म, युडॅसिटीने महाराष्ट्राच्या नक्षल प्रभावित क्षेत्र गडचिरोलीतील तरुण विद्यार्थी स्वप्नील संजय बांगरे, जो युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी झाला, त्याचे स्वप्न खरे करून दाखवले आणि गूगल- युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमात त्याची निवड झाली. स्वप्नीलला युडॅसिटीमध्ये निःशुल्क अँड्रॉइड बेसिक्स अभ्यासक्रमासाठी नामनिर्देशित करण्यात आले आणि त्याने शिकण्यास सुरुवात केलेली आहे. भारतात अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी गूगल- युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात त्याची निवड झाली आणि तो अँग्युलरजेएस अॅप्लिकेशनवर काम करत आहे.
आपला प्रवास आणि मिळालेली संधी याबाबत बोलताना स्वप्नीलने सांगितले, “शिष्यवृत्ती मिळणे हे उडण्यासाठी पंख मिळाल्यासारखे होते. ही अद्भुत संधी प्राप्त झाल्यामुळे मला एक चांगला लीडर आणि अँड्रॉइड डेव्हलपर बनण्यास मदत झाली. मी तरुणांना असे आग्रहाने सांगू इच्छितो की जर तुम्हाला काही शिकायचे असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मला दिलेल्या असाधारण समर्थनाबद्दल मी युडॅसिटीचे माझे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला माझे डेव्हलपर कौशल्य वाढविण्यास आणि त्यात नैपुण्य प्राप्त करण्यास खूप मदत केली.”
आपला नॅनोडिग्रीचा अभ्यासक्रम विकसित करण्याबरोबरच नॅनोडिग्री पूर्ण झाल्यावर आपल्या पदवीधरांना सर्वोत्तम संभाव्य रोजगार संधी उपलबद्ध करून देण्यासाठी युडॅसिटीने गूगल आणि जगातील कित्येक अन्य आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यांनी शिष्यवृत्ती कार्यक्रम सादर करण्यासाठी गूगल, बर्टेल्समान, लिफ्ट आणि एटीअँडटी सारख्या कंपन्याशी देखील भागीदारी केली आहे आणि आजवर जगभरात 180,000 पेक्षा जास्त शिष्यवृत्तींसाठी मदत केली आहे. युडॅसिटी अशा कार्यक्रमांचा उपयोग आपले नॅनोडिग्री कार्यक्रम तसेच आज जगभरात उपलब्ध सर्वोत्तम दर्जाच्या तंत्रज्ञान शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे आपले उद्दीष्ट अधिक चांगल्या रीतीने साध्य करण्यासाठी करते.