Join us  

आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी 'गजब तिची अदा' नाटकाची निवड

By संजय घावरे | Published: December 09, 2023 7:02 PM

या नाटकाची निर्मिती दिनू पेडणेकर, गौरी केंद्रे व श्रीकांत तटकरे यांनी अनामिका व रंगपीठ मुंबई या संस्थांअंतर्गत केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - नॅशनल स्कूल ॲाफ ड्रामाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘तेविसाव्या इंटरनॅशनल फेस्टीव्हल ॲाफ इंडिया’ अर्थात भारंगम म्हणजेच भारत रंग महोत्सवासाठी प्रा. वामन केंद्रे लिखीत-दिग्दर्शित व संगीत दिग्दर्शित 'गजब तिची अदा' या मराठी नाटकाची निवड करण्यात आली आहे. 

१ फेब्रुवारीपासून दिल्ली येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्वात मराठी भाषेतील गाजलेल्या आगळ्या वेगळ्या वैश्विक विषयावरील अनोख्या शैलीत सादर केल्या जाणाऱ्या 'गजब तिची अदा' या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. या नाटकात वामन केंद्रे संचलित व रंगपीठ आयोजित कार्यशाळेमध्ये तयार झालेले २४ अत्यंत गुणी कलाकार परफॉर्म करणार आहेत. यात ऋत्विक केंद्रे, करिश्मा देसले, श्रुती हळदणकर, तेजस्विनी कुराडे, वैष्णवी घोडके, मोहिका गद्रे, अंकिता देसाई, सांप्रती पाटील, श्वेतनील सावंत, तन्वी धुरी, संस्कृती जाधव, समृद्धी देसाई, मंदार पंडीत, सचिन जाधव, अमोल जाधव, मंगेश शिंदे, सुमित भालेराव, अनुप हरिश्चंद्रे, दर्शन रायकर, रोहित कुलकर्णी, मनीष जाधव, महेश महालकर, विभव साळवे आदी कलाकारांचा समावेश आहे. 

या नाटकाचे नेपथ्य नाविद ईमानदार, प्रकाश योजना शितल तळपदे, संगीत संयोजन प्रशांत कदम व सुभाष खरोटे, नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार, वेशभूषा एस. संध्या, रंगभूषा उल्हेश खंदारे करत आहे. साईसाक्षी सादर करत असलेल्या या नाटकाची निर्मिती दिनू पेडणेकर, गौरी केंद्रे व श्रीकांत तटकरे यांनी अनामिका व रंगपीठ मुंबई या संस्थांअंतर्गत केली आहे.

टॅग्स :नाटक