Join us

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्राकडून तीन मराठी चित्रपटांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 10:57 PM

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई: यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या तीनही चित्रपटांच्या चमूचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. 

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाझार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे. 

शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या  माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते. त्यानुसार एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी ग्लोबल आडगाव,  गिरकी आणि बटरफ्लाय या तीन चित्रपटांची निवड केली. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारगोवामहाराष्ट्र सरकार