मुंबई - महिला दिनाचे औचित्य साधून विद्याविहारच्या नीलकंठ किंगडम सोसायटीत महिलांना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी सोसायटीमधील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिला दिनाला प्रत्येक ठिकाणी नृत्य, पार्टी ,सेलिब्रेशन, बाईक रॅली सुरू असते. पण महिलांना व मुलींना स्वसंरक्षण ही काळाची गरज असल्याने, आम्ही सर्वांनी आमच्या सोसायटीत स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा एकमताने निर्णय घेतला, असे येथील सोसायटीच्या सचिव नेहा गांधी यांनी सांगितले.
हा कार्यक्रम बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.सोशल मीडियावर काय दक्षता घ्यावी याची त्यांनी माहिती दिली. तसेच विविध खेळांच्या मार्फत स्वतःची कॅपॅसिटी, मोटिवेशन, स्वतःचे गोल उद्दिष्ट कसे मिळवायचे, स्वार्थी न बनता इतरांनाही कसे सहकार्य करून जिंकता येते असे खेळाचा मार्फत विविध संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
यावेळी महिलांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी इंडोयरू कराटे डु ॲड स्पोर्ट्स असोशियनचे रजन चौहान , कुमारी श्रावणी महाडिक, कुमारी वैष्णवी, रुपल खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. सोसायटीच्या सर्व महिलांनी कमिटी मेंबर्सनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या सर्व टीमचे आभार मानले.