Join us

नालासोपाऱ्यात सेल्फी पाठवून केली आत्महत्या

By admin | Published: September 12, 2015 2:02 AM

नालासोपारा येथे एका वैफल्यग्रस्त व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सेल्फी फोटो काढून आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवले.

वसई : नालासोपारा येथे एका वैफल्यग्रस्त व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सेल्फी फोटो काढून आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवले. व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाहिल्यानंतर पत्नीने त्वरित नालासोपारा पोलिसांकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.जुड मस्कारेनास (४१) हा कर्जबाजारी झाला होता. घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही भरू शकत नव्हता. त्याची पत्नी शिक्षिका असून घरखर्च चालवण्यासाठी ती नोकरी करत ट्युशन क्लासेसही घ्यायची. परंतु पैशाच्या चणचणीमुळे दोघांमध्ये वादविवाद व्हायचा. गेल्या काही दिवसापासुन ते विभक्त राहत होते. जुड ने सेल्फी फोटो काढून ते पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवले. पोलिसांनी त्याची त्वरीत दखल घेत त्याचे घर गाठले परंतु तोपर्यंत त्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.