मुंबई : राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादित होणारी विविध उत्पादने आता अॅमेझॉन या आॅनलाइन शॉपिंग पोर्टलवर मिळणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादित ज्वेलरी, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे १५० उत्पादनांचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अॅमेझॉन, सहेली संकेतस्थळावर लाँचिंग करण्यात आले.ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अॅमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने सहकार्य केले आहे. स्वत: मुंडे यांनीच या संकेतस्थळावर जाऊन पहिली खरेदी केली. ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, अॅमेझॉनचे सतीश उपाध्याय आदी उपस्थित होते.
बचतगटांची उत्पादने आता आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 6:04 AM