एसटीचा स्वयंघोषित चक्काजाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:40 AM2018-08-10T04:40:28+5:302018-08-10T04:40:32+5:30
महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण लागल्याने गुरुवारी मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे एसटी सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.
मुंबई : मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण लागल्याने गुरुवारी मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे एसटी सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. राज्यातील २५० पैकी २१८ आगारांमधून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले.
गुरुवारच्या आंदोलनामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत ८० हजार २०९ फेऱ्यांपैकी ७२ हजार १५३ फेºया रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. परिणामी सुमारे ९० टक्के एसटी फेºया बंद झाल्याचे चित्र होते. तथापि, राज्यातील विविध स्थानकांवर प्रवासी खोळंबल्यामुळे सायंकाळी आंदोलनाची तीव्रता कमी झाल्यानंतर प्रवासी संख्या लक्षात घेत संबंधित विभागांना त्वरित जादा एसटी सोडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. राज्यात १८ हजार ८९० एसटींच्या माध्यमाने रोज एक लाख ८ हजार फेºया पार पडतात.
गुरुवारच्या आंदोलनात १७ एसटींचे नुकसान झाले. यात औरंगाबाद विभागातील ११, नाशिक विभागातील ५ आणि नागपूर विभागातील एका एसटीचा समावेश आहे. दरम्यान, मराठा समाजाने १८ जुलैपासून छेडलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५४२ एसटींची तोडफोड झाली आहे. यामुळे या एसटींची दुरुस्ती आणि उत्पन्न असे सुमारे ३० कोटी आणि गुरुवारी बुडालेला महसूल २० कोटी असे एकूण ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
आंदोलनामुळे राज्यातील २५०पैकी
२१८ एसटी आगार बंद होते.
मुंबई, कोकण (पालघर वगळता),
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा पूर्णत: बंद.
८०,२०९ फेºयांपैकी ७२१५३ फेºया
अर्थात ९० टक्के फेºया रद्द.
१७ एसटी बसचे नुकसान झाले.
पालघर ८३%, विदर्भात ५०% वाहतूक सुरू