मुंबई : शिक्षण विभागाकडून सर्व गोष्टी आॅनलाइन करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र आपल्यावर अविश्वास दाखवला जात असल्याची भावना शिक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून टाकायचे होते. पण तांत्रिक बिघाड आणि प्रशिक्षणाअभावी सेल्फीला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. च्काही शाळांमध्ये सेल्फी काढण्यात आले. पण काही शाळांमध्ये सेल्फी काढले नाहीत. सेल्फी काढायचे, ते अपलोड करण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे काही शाळांत शिक्षकांना अडचणी आल्या. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, यासाठी याआधीही सरकारने काही मोहीम हाती घेतल्या होत्या. शिक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले. काही शाळांत बायोमेट्रिक्स बसवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थीसंख्या कळवण्यात आली आहे. च्आज शाळांत सेल्फी काढण्यात आले. त्यामुळे पहिले दोन तास वाया गेले. आता हे तास कोण भरून काढणार. शिक्षकांना सेल्फीचे आणि ते अपलोड करण्याचे प्रशिक्षण दिले नाही. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
सेल्फीला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: January 10, 2017 7:18 AM