‘पांढऱ्या वाघा’सोबत सेल्फी! होय, शक्य आहे!

By Admin | Published: April 1, 2017 04:28 AM2017-04-01T04:28:54+5:302017-04-01T06:31:43+5:30

तुम्हाला कुणी वाघासोबत त्यातही पांढऱ्या वाघासोबत सेल्फी काढायला सांगितले, तर तुमचे उत्तर ‘अशक्य’ असे असेल. मात्र, आता हे

Selfie with 'White Tiger' Yes, it is possible! | ‘पांढऱ्या वाघा’सोबत सेल्फी! होय, शक्य आहे!

‘पांढऱ्या वाघा’सोबत सेल्फी! होय, शक्य आहे!

googlenewsNext

चेतन ननावरे / मुंबई
तुम्हाला कुणी वाघासोबत त्यातही पांढऱ्या वाघासोबत सेल्फी काढायला सांगितले, तर तुमचे उत्तर ‘अशक्य’ असे असेल. मात्र, आता हे शक्य होणार आहे. कारण पेंग्विनपाठोपाठ शिवसेनेकडून आता राणीबागेत ‘व्हाइट टायगर सफारी’चा प्रस्ताव पुढे येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सफारीमध्ये माणसाळलेल्या पांढऱ्या वाघांसोबत पर्यटकांना सेल्फीही काढता येणार आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन हट्टानंतर आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे जगप्रसिद्ध असलेले पांढरे वाघ राणीबागेत आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पांढऱ्या वाघांसोबत पांढरे अस्वलही राणीबागेत येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरे वाघ आणि अस्वलांच्या आगमनासाठी खुद्द महापालिका आयुक्त अजय मेहता स्वत: पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. पेंग्विन दर्शनामुळे बालराजे सर्वसामान्यांच्या घराघरांत पोहोचले आहेत. त्यात आता अस्वली गुदगुल्या आणि पांढऱ्या वाघांसोबत सेल्फी काढून बालराजेंना राज्यात पोहोचविण्याचा शिवसेनेचा मानस आहे.
आफ्रिकेमध्ये माणसाळलेला चित्ता आणि सिंहासोबत पर्यटकांना फोटो काढता येतात. देशात मात्र अशी सफारी कुठेही नाही. त्यामुळे पेंग्विनपाठोपाठ देशातील पहिली व्हाइट टायगर सफारी सुरू करण्याचा सेनेचा प्रयत्न असेल. मात्र  सध्या सेनेकडे महापालिकेत बहुमत नसल्याने या प्रकल्पाची मदार विरोधकांवर अवलंबून असेल. विशेषत: सेनेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भाजपा अस्वली गुदगुल्या करणार का? यावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.
पेंग्विनला हात लावता येणार?
पांढऱ्या वाघांसह पेंग्विनला हात लावू देता येईल का? यावरही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरू आहे. पेंग्विनला साजेसे हवामान तयार करण्यात महापालिकेला यश मिळाले आहे. मात्र पेंग्विनना काचेआडून पाहताना पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सात पेंग्विनपैकी किमान दोन पेंग्विनला हात लावण्याचा प्रथमदर्शी प्रकल्प राबवण्याचा विचार महापालिका करीत आहे. त्यामुळे काचेआडून पेंग्विन पाहणाऱ्या पर्यटकांना शक्य झाल्यास लवकरच हात लावण्याची मुभाही मिळेल.

पांढरे वाघ वेगळे का?
निसर्गात जुळवून घेण्यासाठी आवश्यक रंगच पाढऱ्या वाघांकडे नसल्याने अन्न मिळवणे त्यांना कठीण जाते. निळे डोळे, गुलाबी नाक, दुधाळ रंगाची कातडी आणि त्यावर चॉकलेटी ते काळे पट्टे असलेले हे वाघ जन्माला येताना जनुकीय आजार घेऊन जन्माला येतात.
जन्माला आल्यावर त्यांचे पाय वाकडे असतात किंवा पाठीचे आजार होतात. काही पांढऱ्या वाघांचे डोळे तिरळे असतात, तर काहींना किडनीचे आजार असल्याचेही निदर्शनास आले आहे.
पांढऱ्या वाघांत नर सुमारे १३ फुटांपर्यंत, तर मादी साधारण ९ फुटांपर्यंत वाढते. जन्मत: पांढऱ्या वाघाची पिल्ले ही केशरी वाघाच्या पिल्लांपेक्षा मोठी असतात. बाकी बहुतेक सर्व गोष्टी या केशरी वाघाशी मिळत्याजुळत्याच असतात.

गुणसुत्रांतील उदासीनता
पांढरे वाघ ही वाघाची स्वतंत्र अथवा उपजात नसून ते अल्बिनो या प्रकारातही गणले जात नसून गुणसूत्रांतील एका विशिष्ट उदासीनतेमुळे त्यांना हा रंग प्राप्त होतो.

Web Title: Selfie with 'White Tiger' Yes, it is possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.