सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठी राहतं घर विकलं, स्वत:सोबत दोन्ही पत्नींना अडकवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 05:35 PM2018-02-15T17:35:32+5:302018-02-15T17:40:57+5:30

माणस उद्योग-व्यवसायामध्ये नशीब आजमावण्यासाठी आपलं राहतं घर तारण ठेवतात किंवा विकतात. पण चेन्नईमध्ये राहणा-या एका व्यक्तिने चक्क सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठीआपलं राहतं घर विकून टाकलं.

Selling a house to try luck in gold smuggling | सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठी राहतं घर विकलं, स्वत:सोबत दोन्ही पत्नींना अडकवलं

सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठी राहतं घर विकलं, स्वत:सोबत दोन्ही पत्नींना अडकवलं

Next
ठळक मुद्देमुंबई विमानतळावरुन सोने बाहेर काढताना बुधवारी कस्टमच्या हवाई गुप्तचर शाखेने बालासुब्रमण्यम आणि त्याच्या पत्नीला अटक केली.कस्टम अधिका-यांनी ते सोने ताब्यात घेऊन जोडप्याला अटक केली आहे.

मुंबई - माणस उद्योग-व्यवसायामध्ये नशीब आजमावण्यासाठी आपलं राहतं घर तारण ठेवतात किंवा विकतात. पण चेन्नईमध्ये राहणा-या एका व्यक्तिने चक्क सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठीआपलं राहतं घर विकून टाकलं. हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला असून त्याने स्वत:सह पत्नीलाही अडचणीत आणले. बालासुब्रमण्यम असे या आरोपीचे नाव असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे.  

मुंबई विमानतळावरुन सोने बाहेर काढताना बुधवारी कस्टमच्या हवाई गुप्तचर शाखेने बालासुब्रमण्यम आणि त्याच्या पत्नीला अटक केली. त्यांच्याकडे चार किलो सोने सापडले असून त्याची किंमत 1 कोटी रुपये आहे.  सुरुवातीला बालासुब्रमण्यमची पत्नी आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगत होती पण नंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. कस्टम अधिका-यांनी ते सोने ताब्यात घेऊन जोडप्याला अटक केली आहे. बालासुब्रमण्यमला दोन बायका आहेत.

आपले दोन विवाह झाले असून मी चेन्नई येथे रहायला आहे. सोन्याच्या स्मगलिंगमध्ये नशीब आजमवण्यासाठी मी नुकतेच माझे घर 65 लाखांना विकल्याचे बालासुब्रमण्यने तपासकर्त्यांना सांगितले. परदेशातून सोने आणण्यासाठी तो दोन्ही पत्नींचा उपयोग करायचा. कस्टमची नजर चुकवून ते सोने विमानतळाबाहेर काढायचे आणि भारतात विकायचे अशी त्याची योजना होती. एक-दोन वेळा अशा प्रकारे सोन्याची स्मगलिंग करण्यात तो यशस्वी ठरला होता. संशय टाळण्यासाठी तो दोन्ही पत्नींना आलटून पालटून परदेशात घेऊन जायचा. विशेष प्रकारच्या अंर्तवस्त्रामध्ये सोने लपवून ठेवायला सांगायचा. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून प्रत्येकवेळी तो देशातल्या वेगवेळया एअर पोर्टवर उतरायचा. 

Web Title: Selling a house to try luck in gold smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.