अमली पदार्थ विक्री; नऊ आफ्रिकन नागरिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:43 AM2018-07-29T01:43:22+5:302018-07-29T01:43:34+5:30

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नऊ आफ्रिकन नागरिकांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ही कारवाई अमलीपदार्थविरोधी पथक (एएनसी)ने केली.

 Selling of substances; Nine African nationals arrested | अमली पदार्थ विक्री; नऊ आफ्रिकन नागरिकांना अटक

अमली पदार्थ विक्री; नऊ आफ्रिकन नागरिकांना अटक

Next

मुंबई : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नऊ आफ्रिकन नागरिकांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ही कारवाई अमलीपदार्थविरोधी पथक (एएनसी)ने केली. यावेळी लाखो रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आल. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला.
चार्ल्स लजिया (२७), ओकोरो अजा (३८), मासकर्ल्स दिनो (३२), सॅम्युअल ओकेनी (३०), केन कोन इशमेल (३७), कोफी रोमालिक (३०), चिकु फ्राय (४३), नन्ना अगवू (२८), जोकु पैस (३२) अशी अटक विदेशी नागरिकांची नावे आहेत. मूळचे आफ्रिकन देशाचे नागरिक असलेले हे आरोपी नवी मुंबई, विरार, मालवणी, सांताक्रुझ, अंधेरी, दिवा तसेच नालासोपारा येथे बेकायदेशीर राहत होते.
एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू होता. मुंबई पोर्ट ट्रस्ट रोडवर एएनसी युनिटचे पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह अन्य पथक गस्तीवर होते. त्या वेळी संशयावरून या नऊ जणांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतील १०४ ग्रॅम कोकेन आणि ९ ग्रॅम मेफेड्रिन आढळले. दोघांकडे चाकू सापडले. कारवाईदरम्यान त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात चार पोलीस जखमी झाले.

Web Title:  Selling of substances; Nine African nationals arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.