सेनेने श्रीनिवासच्या पाठीत खंजीर खुपसला : ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:50 AM2019-04-01T04:50:37+5:302019-04-01T04:51:15+5:30
तलासरीत बैठक : विरोधकांचा समाचार घेत केले मार्गदर्शन
तलासरी : लोकसभेचा उमेदवार म्हणून जिल्ह्यात सर्वत्र फिरून मतदारांच्या भेटीगाठी घेणाऱ्या श्रीनिवास वनगाच्या पाठीतच शिवसेनेने खंजीर खुपसल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदर हितेंद्र ठाकूर यांनी रविवारी केला.
बविआने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी पालघर, मनोर, कासा येथे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले असून कम्युनिस्ट पक्षासह महाआघाडीच्या ताकदीवर आपण विरोधकांना पाणी पाजणार असल्याचा दावा त्यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तलासरी येथील श्यामराव परु ळेकर सभागृहात ठाकूर यांनी मार्क्सवादी व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आ. विलास तरे, माजी खा. बळीराम जाधव, मनीषा चौधरी तसेच सीपीएमचे राज्य सेक्रे टरी कॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटीच्या जनरल सेक्रे टरी मरियम ढवळे, जिल्हा कमिटीचे पदाधिकारी तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचा समाचार घेताना ठाकूर यांनी नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करताना मोदी यांचा उल्लेख हिटलर असा करून मिशन शक्ती, सर्जिकल स्ट्राइक, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आदी विषयांना स्पर्श करत गोरगरिबांना कसे देशोधडीला लावले, याची उदाहरणे दिली. पोटनिवडणुकीत एक मेसेज येताच काँग्रेसमधून भाजपामध्ये जाणारे असे पैसेवाले व पैसे वाटणारे उमेदवार महायुतीला चालतात. श्रीनिवास वनगाला वाºयावर सोडले म्हणत शिवसेनेत घेतले. परंतु, ऐनवेळी त्याला डावलून भाजपच्या खासदाराला शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी दिली जाते. अशा पक्षनिष्ठा नसलेल्या उमेदवाराला आणि पक्षाला लाजच नाही, अशी चपराकही लगावली.
काहींवर विश्वास नाही
च्भाषणाच्या ओघात हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभा, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उतरा व उमेदवार निवडून आणा, असे मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांवर विश्वास नसला, तरी सीपीएम असा एकच पक्ष आहे, जो दगाफटका करणार नाही, अशी पुस्ती जोडली.