अजेंडा राबवण्यास सेनेने सुधारित बजेटमध्ये वाढविले ५०० कोटी!

By admin | Published: February 23, 2016 03:30 AM2016-02-23T03:30:22+5:302016-02-23T03:30:22+5:30

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांची अर्थसंकल्पात उपेक्षा झाल्याची व भाजपाला अनुकूल तरतुदी

Sena increased the revised budget to 500 crore! | अजेंडा राबवण्यास सेनेने सुधारित बजेटमध्ये वाढविले ५०० कोटी!

अजेंडा राबवण्यास सेनेने सुधारित बजेटमध्ये वाढविले ५०० कोटी!

Next

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांची अर्थसंकल्पात उपेक्षा झाल्याची व भाजपाला अनुकूल तरतुदी झाल्याची झोंबरी टीका झाल्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत शिवसेनेचा अजेंडा राबवण्यास स्थायी समितीत सुधारित बजेट मांडून ५०० कोटींचे अतिरिक्त तरतूद करून घेतली. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ, रेसकोर्सवरील थीम पार्क यासारख्या प्रकल्पांसाठी वाढीव तरतूद शिवसेनेने करून घेतली आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी आता सुधारित बजेट ३७,५५२़ १५ कोटींचे झाले आहे. (प्रतिनिधी)

बेस्टला दहावरून शंभर कोटी
पालक संस्था असूनही पालिकेने बेस्टची निव्वळ १० कोटींवर बोळवण केली होती़ यावर बेस्ट समितीनेही नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निधी वाढवून देण्याचे आश्वासन शिवसेनेने केले होते़ त्यानुसार आता १०० कोटी वाढवून याचे श्रेय सेनेने घेतले आहे़ १० कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक बसखरेदीसाठी तर उर्वरित बेस्ट उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणार आहेत़

1.90 कोटी रुपये शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी सुशोभीकरणासाठी

नव्या तरतुदी
05 कोटी रेसकोर्सवर थीम पार्कसाठी
02कोटी माथाडी भवन बांधण्यास
02कोटी रुपये डबेवाला भवनाला
01 कोटी पालिका वार्ताहरांसाठी निधी
1.5कोटी अंधेरी प. येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात सोलर वीजयंत्रणा
01 कोटी पुरातन वारसा जतन करण्यास
01 कोटी नाट्यसंग्रहा-लय उभारण्यास

Web Title: Sena increased the revised budget to 500 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.