शिवसेनेला दणका देणाऱ्या भाजपावर सेनेचा पलटवार, नियुक्ती ठरावांना स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 11:35 AM2020-12-10T11:35:37+5:302020-12-10T11:35:59+5:30

भाजपाने केलेल्या स्वीकृत नगरसेवक नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्तीच्या ठरावांना राज्य शासनाची स्थगिती 

Sena retaliates against BJP for beating Shiv Sena, postpones appointment resolutions by eknath shinde | शिवसेनेला दणका देणाऱ्या भाजपावर सेनेचा पलटवार, नियुक्ती ठरावांना स्थगिती

शिवसेनेला दणका देणाऱ्या भाजपावर सेनेचा पलटवार, नियुक्ती ठरावांना स्थगिती

Next

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेने सह काँग्रेसला धक्का दिला. परंतु आमदार गीता जैन यांच्या तक्रारी नंतर नगरविकास विभागाने ह्या दोन्ही ठरावांना आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याने शिवसेनेचा हा भाजपाला प्रतिधक्का मानला जात आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाकडे पूर्ण बहुमत असून गेल्या सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपाने पाणीपुरवठा  व मलनिःस्सारण ; शिक्षण व समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, क्रीडा व सांस्कृतिक; विधी आणि नियोजन आणि आरोग्य परिरक्षण , वैद्यकीय सहाय्य उद्यान व शहर सुशोभीकरण अश्या ४ तदर्थ समित्यांवर भाजपाच्या नगरसेवकांची नियुक्तीचे ठराव केले. त्या विरोधात आमदार गीता जैन यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तक्रार करून . तदर्थ समित्या ह्या जुलै २०१८ ते जुलै २०१९ ह्या काळा पुरत्याच होत्या. त्यामुळे त्या रद्द झालेल्या असून त्या पुन्हा स्थापन करण्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश संख्याबळ आवश्यक होते .  तसे नसताना भाजपाने केवळ त्यांचेच सदस्य नियुक्तीचा ठराव केला . त्यामुळे तो नियमबाह्य असल्याने ठराव विखंडित करण्याची मागणी केली होती . 

स्वीकृत सदस्य नियुक्तीचा ठराव करताना देखील भाजपाने बहुमताच्या बळावर आयुक्तांनी प्रस्तावात दिलेल्या ५ पैकी भाजपचे ३ आणि काँग्रेसच्या एक अशा ४ उमेदवारांचीच स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्तीचा ठराव केला . शिवसेनेच्या उमेदवारास मात्र कोरोना काळात त्याने जेवण पुरवण्याचे कंत्राट घेतल्याचा आक्षेप घेत त्याचे नाव वगळले . भाजपाने दिलेला धक्का सेनेला चांगलाच बसला . आ. गीता यांनी सदर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा ठराव सुद्धा विखंडित करण्याची तक्रार नगरविकास मंत्री यांना केली होती . 

आ. गीता यांच्या दोन्ही तक्रारींवर मंत्री शिंदे यांनी कार्यवाही करत दोन्ही ठरावास स्थगिती दिली . शिंदे यांच्या आदेशनुसार अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोन्ही ठरावास शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याचे कळवले आहे
 

Web Title: Sena retaliates against BJP for beating Shiv Sena, postpones appointment resolutions by eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.