सेनेचे सीमोल्लंघन यंदा विनाअडथळा

By admin | Published: October 15, 2015 02:47 AM2015-10-15T02:47:26+5:302015-10-15T02:47:26+5:30

सध्या सत्ताधारी भाजपसेनेमधून विस्तव जात नसला तरीदेखील शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी मात्र राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली आहे.

Sena's Seemolalgun is unavailable this year | सेनेचे सीमोल्लंघन यंदा विनाअडथळा

सेनेचे सीमोल्लंघन यंदा विनाअडथळा

Next

दीप्ती देशमुख, मुंबई
सध्या सत्ताधारी भाजपसेनेमधून विस्तव जात नसला तरीदेखील शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी मात्र राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. दसऱ्या मेळाव्यावेळी शिवसेनेने अनेकदा उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्यावर टांगती तलवार असेल, अशीच शक्यता होती. पण राज्य सरकारच्या अनुकूल भूमिकेमुळे दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कला ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. पण राज्य सरकारनेच मेळाव्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्कवर खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रम साजरे करण्यासाठी राखून ठेवलेल्या ४५ दिवसांच्या यादीत दसरा मेळाव्याचा समावेश करण्यास सरकार आणि महापालिकेने स्वत:हून तयारी दर्शवली आहे. इतकेच नाही तर यंदाचा दसरा मेळावा विनाअडथळा पार पडावा, यासाठीही राज्य सरकारने उच्च न्यायालयात ‘नोटीस आॅफ मोशन’ दाखल केले आहे. राज्य सरकारने दसरा मेळाव्यासाठी अनुकूलता दर्शवल्याने सेनेच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला असला तरी उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
>>दादरच्या वेकॉम ट्रस्टने शिवाजी पार्कवरील कार्यक्रमांबाबतची भूमिका याचिकेद्वारे मांडली होती. उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर केले. त्यामुळे या ठिकाणी अन्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.

Web Title: Sena's Seemolalgun is unavailable this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.