मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला आहे. ७ फेब्रुवारीला विविध मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असून ९ फेब्रुवारी २०१८ ला मतमोजणी केली जाणार आहे.या चार अधिकार मंडळांच्या निवडणुकींच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना त्यांचा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत रविवार २१ जानेवारी २०१८ अशी असून २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे २३ जानेवारीला अपील करण्यात येईल. अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची मुदत २५ जानेवारी असून २६ जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच ६६६.े४२ील्लं३ी.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे.९ तारखेला मतमोजणी७ फेब्रुवारी २०१८ रोजी या अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर मतदान केले जाणार असून मतदान केंद्रांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. तसेच ९ फेब्रुवारी २०१८ रोजी मतमोजणी केली जाणार असल्याचे कुलसचिव (प्र), निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ७ फेब्रुवारीला, विविध मतदान केंद्रांवर मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:10 AM