आता 24 तासांत महापालिका खड्डे बुजवणार; मनपाची अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 09:17 AM2019-06-14T09:17:46+5:302019-06-14T09:19:33+5:30
पावसाळा आल्यानंतर बऱ्याचदा खड्ड्यांचा त्रास सतावतो. वाहन चालकांनाही या खड्ड्यांतून मार्ग काढून गाडी चालवावी लागते.
मुंबई- पावसाळा आल्यानंतर बऱ्याचदा खड्ड्यांचा त्रास सतावतो. वाहन चालकांनाही या खड्ड्यांतून मार्ग काढून गाडी चालवावी लागते. महापालिकेकडून हे खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांना बजावण्यात आले असतानाही बऱ्याच ठिकाणी हे खड्डे जैसे थेच असतात. या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीवही जातात. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं खड्डे बुजवण्याची नामी शक्कल लढवली आहे. आता खड्ड्यांचा फोटो पाठवल्यास 24 तासांत ते बुजवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचे व्हॉटस्ऍप नंबर जाहीर केले आहेत.
मुंबई महापालिकेनं 24 वार्डांसाठी 24 व्हॉट्सअॅप नंबर जारी केले असून, आपापल्या विभागात दिसणारे खड्डे या व्हॉट्सअॅपवर टाकल्यास तात्काळ ते बुजवण्यात येणार असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेनं नालेसफाई आणि रस्त्यांची कामं उरकून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी प्रशासनही सक्रिय असून, पावसाळ्यात खड्ड्यातून मार्ग काढणाऱ्या प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून पालिका आतापासून कामाला लागली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तात्काळ बुजवले जावेत, यासाठी ही शक्कल प्रभावी ठरण्याचा मुंबई महापालिकेला विश्वास आहे. मुंबई महापालिकेनं सर्व 24 वॉर्डांमधील रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सअॅप नंबर दिले आहेत. रस्त्यांची तक्रार देण्यासाठी पालिकेनं MCGM 24×7 हे अॅप सुरू केले असून, ते तुम्हाल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. तसेच खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांक 1800221293 यावरही करता येणार आहे.
या नंबरवर खड्डय़ाचा फोटो पाठवा
ए – 8879657698
बी – 8879657724
सी – 8879657704
डी -8879657694
ई – 8879657712 n
एफ-उत्तर – 8879657717
एफ-दक्षिण – 8879657678
जी-उत्तर – 8879657683
जी-दक्षिण – 8879657693
के-पूर्व -8879657651
के-पश्चिम – 8879657649
पी-दक्षिण – 8879657661
पी-उत्तर- 8879657654
आर-दक्षिण- 8879657656
आर-उत्तर- 8879657636
आर-मध्य – 8879657634
एल – 8879657622, 8879657610
एम-पूर्व – 8879657622, 8879657615
एम-पश्चिम – 8879657608
एन – 8879657617
एस – 8879657603
टी – 8879657609.