ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:33 AM2019-09-22T04:33:46+5:302019-09-22T04:33:53+5:30

५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप

Senior bassist Arvind Parikh announces 'Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi Jeevan Gaurav' award | ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

googlenewsNext

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.

१९ आॅक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुढची साठ वर्षे, उस्तादजींच्या अखेरपर्यंत त्यांचे हे शिक्षण अव्याहतपणे सुरू होते. शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला २०१२-१३ पासून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

Web Title: Senior bassist Arvind Parikh announces 'Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi Jeevan Gaurav' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.