मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा असावा यासाठी गेल्या पंधरा वर्षात दोन वेळा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आला होता व तो दोन्ही वेळा फेटाळण्यात आला़ तरीही यासाठी आता पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवण्यात आला असून याला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही़
याबाबत रेल्वे बोर्डाकडून काही सूचना मिळाल्यास त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र पश्चिम रेल्वेने शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केल़े पश्चिम रेल्वेचे विभागीय अधिकारी अशोक तिवारी यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केल़े ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यासाठी सर्वप्रथम 1998 मध्ये बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला़ तो बोर्डाने मान्य केला नाही़ पण दुपारी बारा ते तीन वाजर्पेयत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक डबा राखून ठेवण्याची सूचना बोर्डाने केली़ त्यानंतर पुन्हा 2क्क्5 मध्ये यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला़ तोही बोर्डाने फेटाळला़ याने सर्वसामान्य प्रवाशांना जागा अपुरी पडेल, असे कारण बोर्डाने दिले होते, असे या प्रतिज्ञापत्रत नमूद केले आह़े
तसेच या मागणीसाठी पुन्हा याच महिन्यात 3 तारखेला बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आह़े कारण बोर्डाच्या परवानगीशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा राखीव ठेवता येणार नाही, असा दावा प्रतिज्ञापत्रत करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)
ए़ बी़ ठाकूर यांनी न्यायालयाला ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा असावा अशी विनंती केली होती़ या पत्रची दखल घेत न्यायालयाने याचे सुओमोटो जनहित याचिकेत रूपांतर करून घेतले व याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश रेल्वेला दिल़े त्यानुसार पश्चिम रेल्वेने प्रतिज्ञापत्र सादर केल़े