मुंबई : स्पर्धात्मक युगात पोटच्या पोरांनाही आपल्या आईवडिलांचा विसर पडू लागल्याने, ज्येष्ठ नागरिक निराधार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वृद्ध आईला रस्त्यावर टाकून पसार झाल्याचे अनेक प्रकार, मुंबईतच गेल्या काही महिन्यांमध्ये घडले आहेत. त्यामुळे अशा निराधार ज्येष्ठांना मानसिक आधार व त्यांच्या डोक्यावर छप्पर देण्यासाठी, मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईच्या विकास आराखड्यात वृद्धाश्रमासाठी २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.मुंबईत अनाथाश्रमांप्रमाणेच वृद्धाश्रमही वाढविण्याची मागणी अनेक वेळा होत असते. २०१५ मध्ये तत्कालीन नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी याबाबत ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेपुढे मांडली होती. ही मागणी महासभेत मंजूर होऊन आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. यावर आयुक्तांनीही सकारात्मक अभिप्राय देत, विकास नियोजन आराखडा २०१४ ते २०३४ मध्ये वृद्धाश्रमासाठी तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.वृद्ध नागरिकांसाठी प्रत्येक विभागात वृद्धाश्रम असावे, यासाठी २६ जागांवर एकूण ५.०८ हेक्टर क्षेत्रफळ आरक्षित करण्यात आले होते. मात्र, नियोजन समितीने यापैकी एक आरक्षण वगळून, आणखी तीन नवीन आरक्षणे प्रस्तावित करण्याची शिफारस केली. त्यानुसार, २८ आरक्षणांचे एकूण क्षेत्रफळ ५.३ हेक्टर एवढे आहे. पुढील २० वर्षांमध्ये मुंबईचा विकास करताना, मागणीनुसार या आरक्षणावर वृद्धाश्रम तयार होणे अपेक्षित आहे.निवाºयाची सोय होणारनिराधार वृद्धांच्या निवाºयाची सोय व्हावी, यासाठी २६ जागांवर एकूण ५.०८ हेक्टर क्षेत्रफळ आरक्षित करण्यात आले होते.नियोजन समितीने यापैकी एक आरक्षण वगळून, आणखी तीन नवीन आरक्षणे प्रस्तावित करण्याची शिफारस केली.या शिफारशीनुसार एकूण ५.३ हेक्टर क्षेत्रफळ आरक्षित ठेवण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना पालिकेचा आधार! वृद्धाश्रमासाठी २८ जागांवर आरक्षण, विकास नियोजन आराखड्यात तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:59 AM