पोस्टाच्या योजनांची बॅंकांना टक्कर; ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात सर्वाधिक व्याज 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:59 AM2023-12-12T09:59:06+5:302023-12-12T10:03:08+5:30

बँकांच्या तुलनेत पोस्टात व्याजदर परतावाही अधिक आहे.

Senior citizens have the highest interest in the post mumbai | पोस्टाच्या योजनांची बॅंकांना टक्कर; ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात सर्वाधिक व्याज 

पोस्टाच्या योजनांची बॅंकांना टक्कर; ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात सर्वाधिक व्याज 

मुंबई : सध्याच्या जमान्यात बँकांपेक्षा टपाल विभाग हा गुंतवणुकीसाठी अधिक विश्वसनीय आहे. शिवाय, बँकांच्या तुलनेत पोस्टात व्याजदर परतावाही अधिक आहे. त्यामुळे काळ बदलला असला तरीही ज्येष्ठ नागरिक अजूनही पोस्टाच्या गुंतवणुकीशी
अधिक एकनिष्ठ आहेत, अशी माहिती टपाल विभागाने दिली आहे. 

मुंबईत टपाल विभागात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आतापर्यंत २५ हजार ६४९ ज्येष्ठांनी खाती सुरू केली आहेत,  अशी माहिती टपाल विभागाने दिली. या योजनेत परतावा हमखास मिळतो, ही सरकारची लहान बचत योजना असल्याने ती ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांत सुरक्षित आणि सर्वांत विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.

याकडे वाढतोय कल :

पोस्ट विभागातील टाइम डिपॉझिट योजना बँकांच्या मुदतठेव ही योजना ज्येष्ठ नागरिक गटात अधिक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे याकडे ज्येष्ठ नागरिकांचा अधिक कल आहे.

ज्येष्ठांच्या एफडी वाढल्या 

रखेपासून पाच वर्षांनी ज्येष्ठ बचत खाते परिपक्व होते. व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी जमा होत असते. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांबरोबरच पोस्टातील ठेवींची संख्यादेखील वाढली आहे. 

४.५ ते ८.२ असा वाढतो व्याज दर 
                                    (टक्क्यांमध्ये)

ज्येष्ठ नागरिक बचत खाते     ८.२
राष्ट्रीय बचत खाते                 ७.७
१ वर्षे मुदत ठेव                    ६.८
२ वर्षे मुदत ठेव                    ६.९
३ वर्षे मुदत ठेव                    ७.०
५ वर्षे मुदत ठेव                   ७.५
आरडी ५ वर्षे                      ७.२
किसान विकास पत्र             ७.५
मासिक उत्पन्न योजना         ४.५
बचत खाते                          ४.०
भविष्य निर्वाह निधी            ७.१

Web Title: Senior citizens have the highest interest in the post mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.