Join us

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक तणावाखाली

By admin | Published: July 08, 2016 4:12 AM

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक प्रचंड तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत मुंबईतील २ हजार ५६९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू हा

मुंबई : मुंबईतील ज्येष्ठ नागरिक प्रचंड तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत मुंबईतील २ हजार ५६९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू हा तणावामुळे झाल्याची नोंद महापालिकेने केलेली आहे.मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यावर २१८ कोटी रुपये खर्च करते. मात्र त्याचा म्हणावा तितका फायदा अद्याप समोर आलेला नाही. कारण मुंबईतील आरोग्याच्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढत प्रजा फाउंडेशनने येथील थैमान घातलेल्या टीबी, मलेरिया, डेंग्यू आणि विविध साथींच्या आजारांवर प्रकाश टाकला आहे. या सर्व रोगांच्या मुळाशी असलेल्या तणावाच्या विळख्यात मुंबईतील ज्येष्ठ अडकल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमधून स्पष्ट झाले. तणावाच्या कारणास्तव मुंबईत एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३ हजार २०५ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यातील सुमारे ८० टक्के म्हणजेच २ हजार ५६९ मृत्यू पावणारे लोक हे ६० वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय ४० ते ५९ वयोगटातीत ५७० लोकांचे मृत्यू तणावामुळे झाले आहेत. साथीच्या आजारांबाबतही प्रजाने काढलेली माहिती धक्कादायक आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत डेंग्यूसारख्या भयंकर आजारामध्ये ८ पटीने वाढ झाल्याचेही प्रजाने मांडलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये दिसते. या वर्षी मुंबईत डेंग्यूच्या १५ हजार २४४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)एल वॉर्डला धोक्याचा इशाराप्रजाने सादर केलेल्या अहवालात एल वॉडमध्ये साथींच्या आजारांनी अक्षरश: थैमान घातल्याचे दिसत आहे. मलेरिया, टीबी, जुलाब, तणाव या आजारांचे सर्वाधिक रुग्ण एल वॉर्डमध्ये असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या वॉर्डसाठी महापालिकेला विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत प्रजाने व्यक्त केले.कॉलराही बळावला२०१४-१५ ते २०१५-१६ पर्यंत मुंबईमध्ये कॉलराच्या नोंदींमध्ये सातपटीने वाढ झाली आहे. २०१४-१५ साली मुंबईत कॉलराचे ३१ रुग्ण आढळले होते. मात्र अवघ्या एका वर्षांत कॉलराने संपूर्ण मुंबईत हात-पाय पसरले असून २०१५-१६ सालात कॉलरा रुग्णांची संख्या २०७ वर गेली आहे.एफ साऊथला मलेरियाचा धोका : एफ साऊथ या वॉर्डमध्ये २०१५ साली मलेरियाचे सर्वाधिक म्हणजेच ८१२ रुग्ण आढळले आहेत. मात्र २०१४-१५ सालच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. याउलट मुंबईतील गेल्या पाच वर्षांतील मलेरिया रुग्णांची संख्या तीन पटीने कमी झाल्याचे दिसते. म्हणजेच पालिकेला मलेरियावर नियंत्रण ठेवण्यात यश येत आहे.के-पूर्व वॉर्डमध्ये डेंग्यूचे थैमान : २०१४-१५ सालच्या तुलनेत २०१५-१६ सालात के-पूर्व वॉर्डमधील डेंग्यूच्या रुग्णांत तिपटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय एस वॉर्डमध्येही अवघ्या एका वर्षात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २८ वरून ३०८ वर पोहोचली आहे.टीबी फोफावतोयएमसीजीएमच्या वर्बल आॅटोस्पी अहवालाने दाखवल्यानुसार 2014मध्ये ७ हजार ९० लोकांचा मृत्यू टीबीमुळे झाला होता. मात्र टीबी नियंत्रण युनिटने दिलेल्या माहितीनुसार, केवळ १ हजार ३५१ लोकांचा मृत्यू टीबीने झाला आहे.33,442लोकांना गेल्या ५ वर्षांत टीबीमुळे जीव गमावावा लागला आहे. याचाच अर्थ मुंबईत सरासरी दररोज १९ लोकांचा मृत्यू टीबीमुळे होत आहे. मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६८ टक्के असून महिलांचे प्रमाण ३२ टक्के आहे.2015-16मध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण एल वॉर्डमध्ये (१ हजार ४२२ रुग्ण) निदर्शनास आले असून, त्याखालोखाल एच-पूर्व (५३२ रुग्ण) आणि के-पूर्व (४९१ रुग्ण) या वॉर्डचा क्रमांक आहे. त्यामुळे महापालिकेने या वॉर्डकडे अधिक सजगतेने लक्ष देण्याची गरज प्रजाने व्यक्त केली.मुंबईत विविध कारणास्तव वयोगटानुसार झालेले मृत्यू (एप्रिल-डिसेंबर २०१५)४ पेक्षा कमी५ ते १९२० ते ३९४० ते ५९ ६०हून अधिक नोंद नाही एकूणमलेरिया२६२७२९२००८४टीबी३५२३६१२३६१५५२१०१८० ४०७७डेंग्यू६२४४७२६२१०१२४मधुमेह२४५१४४४१३८४०१८८५जुलाब ३५१११२६५२०१२५अतिरिक्त ताण ९४५३५७०२५६९०३२०५इतर कारणे३४६४१५१८६०२९११६०२२७३०४१४९९१८एकूण मृत्यू३५५३१७९३७४५४१४२४९३२३६८१५९४१८