Join us

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक तणावाखाली

By admin | Published: July 07, 2016 9:29 PM

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक प्रचंड तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत मुंबईतील २ हजार ५६९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू हा तणावामुळे झाल्याची नोंद

नऊ महिन्यांत अडीच हजार ज्येष्ठांचे मृत्यूमुंबई : मुंबईतील ज्येष्ठ नागरिक प्रचंड तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत मुंबईतील २ हजार ५६९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू हा तणावामुळे झाल्याची नोंद महापालिकेने केलेली आहे.मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यावर २१८ कोटी रुपये खर्च करते. मात्र त्याचा म्हणावा तितका फायदा अद्याप समोर आलेला नाही.

कारण मुंबईतील आरोग्याच्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढत प्रजा फाउंडेशनने येथील थैमान घातलेल्या टीबी, मलेरिया, डेंग्यू आणि विविध साथींच्या आजारांवर प्रकाश टाकला आहे. या सर्व रोगांच्या मुळाशी असलेल्या तणावाच्या विळख्यात मुंबईतील ज्येष्ठ अडकल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमधून स्पष्ट झाले. तणावाच्या कारणास्तव मुंबईत एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊमहिन्यांच्या कालावधीत एकूण ३ हजार २०५ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

मात्र त्यातील सुमारे ८० टक्के म्हणजेच २ हजार ५६९ मृत्यू पावणारे लोक हे ६० वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय ४० ते ५९ वयोगटातीत५७० लोकांचे मृत्यू तणावामुळे झाले आहेत.

साथीच्या आजारांबाबतही प्रजाने काढलेली माहिती धक्कादायक आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत डेंग्यूसारख्या भयंकर आजारामध्ये ८ पटीने वाढ झाल्याचेही प्रजाने मांडलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये दिसते. या वर्षी मुंबईत डेंग्यूच्या १५ हजार २४४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.