राज्यातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित

By admin | Published: October 1, 2015 02:18 AM2015-10-01T02:18:55+5:302015-10-01T02:18:55+5:30

ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट बनत आहे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या

Senior citizens in the state are the most vulnerable | राज्यातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित

राज्यातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित

Next

ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट बनत आहे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या आकडेवारीवरून ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध झालेल्या गुन्ह्याच्या नोंदी तपासून पाहता, हे भीषण वास्तव समोर येते.
ज्येष्ठ नागरिकांच्या खूनाच्या प्रयत्नातही महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागत असून २०१४ या वर्षात ५४ ज्येष्ठ नागरिकांना जीवे मारण्याचे प्रयत्न झाल्याचे आकडेवारी सांगते. तसेच सदोष मनुष्य वधाचेही गुन्हेही ११ ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध घडले आहेत.
ज्येष्ठ महिलांविरुद्ध बलात्काराचे नऊ गुन्हे गेल्या वर्षात घडले आहेत. तसेच दरोड्याचे तब्बल २४ गुन्हे राज्यात घडले आहेत.
परंतु, ज्येष्ठ नागरिकांविरोधात सुदैवाने रक्तरंजित दरोड्याची एकही घटना राज्यात घटलेली नाही.
सामाजिक, तसेच आर्थिक दृष्ट्याही ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असल्याचे दिसून येते. त्यांच्या खूनामागील बहुतेक कारणे ही आर्थिकच आहेत.
170
ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशात हे प्रमाण तिसऱ्या क्रमांकाचे आहे.
लूटमारीच्या घटना सर्वाधिक
ज्येष्ठ नागरिकांच्या लूटमारीच्या सर्वाधिक घटना राज्यात घडल्या आहेत. २०१४ या वर्षात ६२३ घटनांमध्ये तब्बल ६२७ ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यात आले आहे. हे प्रमाण देशातील अन्या कोणत्याही राज्यापेक्षा प्रचंड अधिक आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये थेट १२९ ज्येष्ठ नागरिकांच्या लूटमारीच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Senior citizens in the state are the most vulnerable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.