ज्येष्ठ नागरिकांना घरातच क्वारंटाइन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:56 PM2020-09-15T15:56:28+5:302020-09-15T15:57:06+5:30

पालिकेने पुन्हा निर्णय बदलला

Senior citizens will be quarantined at home | ज्येष्ठ नागरिकांना घरातच क्वारंटाइन करणार

ज्येष्ठ नागरिकांना घरातच क्वारंटाइन करणार

googlenewsNext

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार सुरूच असून मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयातच वयोवृद्ध रुग्णांवर उपचार केले जातील, असे पालिकेने २१ ऑगस्टला जाहीर केले. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये खाट मिळत नाहीत तर पालिका आणि कोविड केंद्रांमध्ये उपचार करून घेण्यास बहुसंख्य नागरिक तयार होत नाहीत. यासाठी पालिकेने आपल्या निर्णयावरून यूटर्न घेत वयोवृद्ध रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता वयोवृद्ध रुग्णांना घरातच क्वारंटाईन केले जाणार आहे.

मुंबईत जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांत ७० ते ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन केले जात होते. मात्र कोरोनामुळे वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा मृत्यूदर रोखण्यासाठी पालिकेने लक्षणे नसलेल्या पण ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना रुग्णालयात, कोरोना केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल होणे सक्तीचे केले. ज्येष्ठांना चांगल्या देखभालीसह चांगले उपचार मिळावेत, यासाठी नातेवाईकांकडून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊ लागले. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोना झालेल्या पण लक्षणे नसलेल्या ज्येष्ठांची संख्या वाढली. यामुळे कोरोना झालेल्या इतर रुग्णांना खाट मिळेनासे झाले. कोरोनाच्या सर्व रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पालिकेने लक्षणे नसलेल्या वृद्धांना घरातच क्वारंटाईन करावे, असे निर्देश नव्याने दिले आहेत. मुंबईत कोरोनामुळे वृद्ध दगावण्याचे प्रमाण हे ५७ टक्के इतके आहे.

मुंबईत सध्या इमारती आणि उच्चभ्रूंच्या वस्तींमधून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पालिकेच्या आधीच्या नियमामुळे अशा इमारती किंवा घरातील कोरोना झालेल्या ज्येष्ठ रुग्णांना पालिका रुग्णालयात दाखल व्हायचे नसायचे. त्यामुळे ते खासगी रुग्णालयांकडे जात होते. त्यामुळे खासगी रुग्णालयात बेड मिळेनासे झाले. पण खरे तर वृद्ध रुग्णालयापेक्षा घरातील प्रेमळ माणसांच्या सहवासात राहणे अधिक पसंत करतात. अशा रुग्णांवर वॉररूमच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्यांच्या उपचारांचा फॉलोअ‍प घेतला जात आहे.

Web Title: Senior citizens will be quarantined at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.