Join us

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल शिवसेनेच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 4:28 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

गोंदिया : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुंबई येथे त्यांनी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर भेट घेतल्याने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. अग्रवाल हे काँग्रेसचे वजनदार नेते असून १२ वर्षे विधान परिषद आणि तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधी त्यांनी केले आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांसोबतही त्यांचे मधूर संबंध आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपालदास अग्रवाल हे सुध्दा भाजपमध्ये जाणार या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले होते.मात्र स्वत: अग्रवाल यांनी आपण कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र अचानक त्यांनी मुंबई येथे शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.गोंदिया विधानसभेची जागा ही युतीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली होती.यावेळी त्यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली. निवडणुकी दरम्यान राजकीय भेटीगाठी होत असतात याचा अर्थ त्या पक्षात प्रवेश करणार असा होत नाही. मी काँग्रेसमध्येच आहे.- गोपालदास अग्रवाल, आमदार गोंदिया. 

टॅग्स :काँग्रेसशिवसेना