Join us

ज्येष्ठ पत्रकार, लेखक मधू शेट्ये यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 9:05 AM

सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये यांचं निधन झालं आहे.

मुंबई: सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये यांचं निधन झालं आहे. मुंबईत आज पहाटेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्रकार मधु शेट्ये यांनी फ्री प्रेस जर्नलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर अनेक वर्तमानपत्रांत त्यांनी काम केले. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनातही शेट्ये सक्रिय होते. मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही ते राहिले होते. शेट्ये यांनी 'चले जाव चळवळ', 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ', तसेच तसेच गोवा मुक्ती आंदोलनात योगदान दिलं. मधू शेट्ये हे मुंबई प्रेस क्लबचे संस्थापक होते.पत्रकार मधु शेट्ये यांनी फ्री प्रेस जर्नलमधून आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पेट्रीऑट डेली आणि लिंक विकली या वर्तमानपत्रांत काम केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनातही शेट्ये यांनी आपले योगदान दिले. सन 1961मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. या बरोबरच त्यांनी वर्षं 1966 ते 1968 या कालावधीत स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यांनी क्लॅरिटी या इंग्रजी साप्ताहिक देखील सुरू केले होते.