मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि शिवाजी मंदिरचे माजी अध्यक्ष शशिकांत भालेकर यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
शशिकांत भालेकर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी शुभांगी ,पुत्र दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर, मुलगी अक्षदा विचारे आणि नातू अमेय आणि आणि सून हा परिवार आहे.
शशिकांत मुकुंद भालेकर यांनी मराठा दैनिकापासून आपल्या सिनेपत्रकारितेला आरंभ केला. त्यानंतर चतुरस्त्र लिखाण त्यांनी केले. माधव गडकरींच्या काळात लोकसत्तामध्ये त्यांनी दूरदर्शन आणि सिनेलिखाण केले.
याशिवाय, शशिकांत भालेकर हे शिवाजी मंदिरचे अध्यक्ष होते. तसेच, ते सिबा गायगी या कंपनीतून असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते.
आणखी बातम्या..
...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प
लॉकडाऊन-5 लागू होणार? अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक