Join us

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापू आडिवरेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:06 AM

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण शांताराम उर्फ बापू आडिवरेकर यांचे कोरोनाने नुकतेच कोकणातील राजापूर येथे निधन झाले....

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण शांताराम उर्फ बापू आडिवरेकर यांचे कोरोनाने नुकतेच कोकणातील राजापूर येथे निधन झाले.

ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बापू आडिवरेकर यांचा जन्म राजापूर येथे १९५५ साली झाला. ते कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथून २०१७ साली सेवानिवृत्त झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करताना त्यांचे गोपीनाथ मुंडे, लीलाधर डाके, नारायण राणे, गणेश नाईक आदी नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. रक्तदान, आरोग्य शिबिरे, बेरोजगारांना मार्गदर्शन आदी कार्यांत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी कोकणात जाऊन तेथेच जन्मभूमी असलेल्या ठिकाणी आपली कर्मभूमी म्हणून अखेरपर्यंत कार्यरत राहताना समाजाला रक्तदान, देहदान आणि मतदान याचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी जनजागृती केली. त्यांनी स्वतः देहदान केले हाेते, मात्र त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.

------------------------------------------------------------------------------------