ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:31 PM2018-12-23T13:31:22+5:302018-12-23T13:52:21+5:30
माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन झाले आहे.
मुंबई- माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन झाले आहे. नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल होते. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. मुंबईतल्या चर्चगेटमधल्या राहत्या घरीच त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाजपाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होते. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संस्थापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे. 2005साली त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांवर ते अचूक शब्दांमध्ये भाष्य करत होते.