उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त दैनिक लोकमत आणि मुलुंड जिमाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंडमध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जिमाखान्याच्या पदाधिकारी, सदस्यांसह ६९ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला. रक्ताअभावी वडिलांना गमवावे लागले, दुसऱ्यावर ती वेळ येऊ नये, म्हणत रोहन कारेकर या तरुणानेदेखील या शिबिरात रक्तदान करून वडिलांना श्रद्धांंजली वाहिली.
मुलुंड जिमखाना अध्यक्ष चेतन साळवी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिव प्रकाश बारकू पाटील, उपाध्यक्ष विजय पांचाळ, सहसचिव मधुकर ताम्हणकर, खजिनदार अमेय कुर्डुरकर, विश्वस्त अध्यक्ष मंदार वैद्य, विश्वस्त सदस्य आनंद प्रधान, सदस्य समीर वैद्य, कमिटी सदस्य आशुतोष साळवेकर, अनुपम जोशी, उमेश शुक्ल, समीर वैद्य, विश्वजीत वाकसकर, मनोज सकपाळ माजी शिवसेना शाखा प्रमुख दीपक सावंत, यांच्यासह जिमखान्याचे पदाधिकारी, सदस्य, उपस्थित होते.
साळवी सांगतात, कोरोनाच्या महामारीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असताना लोकमतच्या या महायज्ञात मुलुंड जिमाखान्यानेही पुढाकार घेतला. सर्वानी रक्तदानासाठी पुढे यायला हवे. या महादानामुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. मुलुंड जिमाखान्याची नेहमीच अशा विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकीची नाळ अधिक घट्ट करण्याची धडपड सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रक्तदान करत वाढदिवस साजरा
रक्तदान करत म्हाडा कॉलनीतील किरण जाधव या तरुणाने यावेळी वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची पत्नीही सोबत होती.
मान्यवरांची रेलचेल...
नगरसेविका रजनी केणी, सुजाता पाटील, समाजसेविका पल्लवी संजय पाटील, राजोल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.