सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला

By admin | Published: June 26, 2014 10:11 PM2014-06-26T22:11:14+5:302014-06-26T22:11:14+5:30

नैसर्गिक गॅसच्या दरातील वाढ केंद्र सरकारने टाळल्यामुळे शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला.

The Sensex fell by 251 points | सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला

सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला

Next
>मुंबई : नैसर्गिक गॅसच्या दरातील वाढ केंद्र सरकारने टाळल्यामुळे शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला. या घसरगुंडीचा सर्वाधिक फटका ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला. डेरिवेटिव्ह करारांच्या मासिक निपटा:याचा फटकाही बाजाराला बसल्याचे सूत्रंनी सांगितले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी 25,217.69 अंकांवर कमजोरीने उघडला. एका क्षणी तो 25,021.23 अंकांर्पयत खाली आला होता. दिवस अखेरीस 251.07 अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स 25,062.67 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.99 टक्के आहे. काल सेन्सेक्स 55.16 अंकांनी कोसळला होता. त्यानंतर आज घसरणीचा मोठा धमाका बाजारात पाहायला मिळाला. 18 जूननंतर सेन्सेक्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. 18 जून रोजी सेन्सेक्स 274.94 अंकांनी कोसळला होता.  नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 76.05 अंकांनी कोसळून 7,500 अंकांच्या खाली 7,493.20 अंकांवर बंद झाला. दिवसभर तो 7,481.30 ते 7,570.20 अंकांच्या मध्ये खालीवर होत होता. सेंसेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यांपैकी 18 कंपन्यांत घसरण पाहायला मिळाली. 12 कंपन्या लाभात राहिल्या. 
बोनांझा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, काल केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसच्या दरवाढीचा निर्णय तीन महिन्यांसाठी पुढे ढकलला. त्याचा बाजार धारणोवर विपरीत परिणाम झाला. बाजार नकारात्म मोडमध्ये गेला.  सार्वजनिक क्षेत्रतील तेल आणि नैसर्गिक गॅस कंपनी अर्थात ओएनजीसीचा शेअर 5.89 टक्क्यांनी कोसळला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 3.70 टक्क्यांनी कोसळला. याशिवाय बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईल या अन्य सरकारी कंपन्यांच्या शेअर्सवरही विक्रीचा दबाव होता. (प्रतिनिधी)

Web Title: The Sensex fell by 251 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.