मुंबई : एक दिवसाच्या घसरणीनंतर देशी शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी परतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 45.82 अंक आणि 15.80 अंकांनी बळकट झाला. कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बँक, वाहन आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या शेअर्स खरेदीमुळे बाजारात तेजी आली.
विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचाही प्रवाह कायम राहिला. एका आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल 251.36 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले.
एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, सन फार्मा, अॅक्सिस बँक आणि हीरो मोटोकार्प या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदली गेली. दुसरीकडे एचडीएफसी, सेसा स्टरलाईट, टाटा स्टील, एनटीपीसी, हिंदाल्को आणि टाटा पॉवर यांचे समभाग कोसळले. पोलाद कंपन्यांच्या शेअर्सना बाजारातील कमजोर संकेतांचा फटका बसला.
5क् शेअर्सवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 15.8क् वा क्.2क् टक्क्यांच्या सुधारणोसह 7,891.1क् अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टी 7,855.95 ते 7,919.65 अंकादरम्यान राहिला. निफ्टी काल 22.2क् अंकांनी घसरला होता.
बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले की, उच्च पातळीवर नफेखोरी आणि तेजी राहिली. जागतिक बाजारात संमिश्र कल राहिला. तथापि, कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने बाजारधारणा मजबूत झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवरील 3क् पैकी 15 कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. (प्रतिनिधी)
43क् शेअर्सवर आधारित सेन्सेक्स सुरुवातीला स्थिर होता. मात्र, नंतर तो 26,462.52 अंकांर्पयत खाली घसरला. युरोपीय बाजारामध्ये सुरुवातीच्या व्यवहारात तेजी असल्याचे वृत्त थडकताच सेन्सेक्स 45.82 अंक वा क्.17 अंकांनी बळकट होऊन 26,36क्.11 अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स 1क्6 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.