Join us

खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी नव्या उंचीवर

By admin | Published: September 03, 2014 2:32 AM

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच 27,000 अंकांची मनोवैज्ञानिक पातळी पार केली. दुसरीकडे निफ्टीने 8,1क्क् अंकांची पातळी सर केली.

शेअर बाजारात उत्साह : बीएसईने 27 हजारांची पातळी गाठली
मुंबई : चालू खात्यातील तूट अर्थात कॅडमध्ये घट झाल्याच्या पाश्र्वभूमीवर औषध, तेल आणि गॅस व वाहन क्षेत्रतील शेअर्सला चोहोबाजूंनी मागणी झाली. परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच 27,000 अंकांची मनोवैज्ञानिक पातळी पार केली. दुसरीकडे निफ्टीने 8,1क्क् अंकांची पातळी सर केली.
बीएसईचा 3क् शेअर्सवरील सेन्सेक्स मंगळवारी सलग आठव्या दिवशी तेजीत राहिला. सेन्सेक्स प्रारंभीच्या व्यवहारात 27,क्82.85 अंक ही आतार्पयतची उचांकी पातळी गाठली. अखेरीस तो 151.84 अंक म्हणजेच क्.57 टक्क्यांच्या तेजीसह नवी विक्रमी पातळी 27,क्19.39 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सला 26,क्क्क् ते 27,क्क्क् अंकांची मनोवैज्ञानिक पातळी गाठण्यास 7 जुलैपासून 2 सप्टेंबर्पयतचा अवधी लागला. 4क् सत्रंमध्ये सेन्सेक्सने ही पातळी गाठली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8,1क्क् ही मनोवैज्ञानिक पातळी ओलांडत दिवसभरात 8,1क्1.95 अंकांर्पयत गेला. तथापि, नंतर यात अल्पशी घसरण झाली आणि अखेरीस 55.35 अंकांनी उसळी घेत 8,क्83.क्5 अंकांवर बंद झाला.
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक व देशी पातळीवरील सकारात्मक घडामोडींनी बाजाराला बळ मिळाले.
 एप्रिल-जूनच्या तिमाहीत चालू खात्यातील तूट जीडीपीच्या 1.1 टक्क्यावर राहिली. पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 5.7 टक्के एवढा राहिला. (प्रतिनिधी)
 
सिप्लाला तेजीचा लाभ
निर्देशांकावर आधारित शेअर्समध्ये सिप्लाचे समभाग 5.23 टक्क्यांनी मजबूत झाले. याशिवाय भारती एअरटेलचे शेअर्स 4.24 टक्के, सनफार्मा 2.5क् टक्के, एचडीएफसी बँक 2.क्1 टक्के, ओएनजीसी 1.15 टक्के, आयटीसीचे शेअर 1.28 टक्क्यांनी बळकट झाले. दुसरीकडे विक्री झाल्याने एसएसटीएल, टाटा पॉवर, हिंदाल्को, विप्रो, टाटा स्टील यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.