सेन्सेक्स, निफ्टीची आणखी भरारी
By admin | Published: September 4, 2014 01:53 AM2014-09-04T01:53:42+5:302014-09-04T01:53:42+5:30
शेअर बाजारात आज सलग नवव्या दिवशी तेजीचे वातवारण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 121 अंकांनी वाढून 27,139.94 अंकांवर पोहोचला.
Next
मुंबई : शेअर बाजारात आज सलग नवव्या दिवशी तेजीचे वातवारण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 121 अंकांनी वाढून 27,139.94 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 31.55 अंकांनी वाढून 8,114.60 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांची ही विक्रमी पातळी आहे.
सकारात्मक आर्थिक संकेत आणि विदेशी संस्थांनी केलेली गुंतवणूक या बळावर शेअर बाजार वर चढले आहेत. आयटी क्षेत्रतील शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा 30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच मजबुतीने उघडला होता. एका क्षणी तो 27,225.85 अंकांवर पोहोचला होता. ही सेन्सेक्सची आजर्पयतची सर्वोच्च पातळी होती. मात्र, या पातळीवर पोहोचल्यानंतर बाजारात नफा वसुलीचा जोर वाढल्याने जोरदार विक्री सुरू झाली. त्यामुळे तो खाली आला. दिवसअखेरीस 120.55 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 27,139.94 अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सर्वोच्च पातळीवरचा बंद ठरला आहे. गेल्या 9 व्यावसायिक सत्रंपासून सेन्सेक्स सलग वाढतो आहे. या 9 सत्रंत 825 अंकांचा लाभ सेन्सेक्सने मिळविला आहे. (प्रतिनिधी)