Join us

सार्वजनिक शौचालय वापरण्यास योग्य आहे की नाही, हे सांगणार सेन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 6:24 AM

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जगतात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मॅस्टेक प्रोजेक्ट डीप ब्ल्यू या नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सार्वजनिक शौचालये, तेथील अस्वच्छता व उपायांबाबत भायखळा येथील साबू सिद्दिक महाविद्यालयाचा प्रकल्प नावीन्यपूर्ण ठरला.

सीमा महांगडे

मुंबई : सार्वजनिक शौचालय म्हटले की, मुंबईकर नाक मुरडतात. अनेकदा ते अस्वच्छ असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून सार्वजनिक शौचालयात जाणे टाळले जाते. हे लक्षात घेऊनच सार्वजनिक शौचालय कितपत वापरण्यायोग्य आहे, ते आरोग्यास हानिकारक आहे का, हे तपासणारे उपकरण साबू सिद्दिक इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जगतात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मॅस्टेक प्रोजेक्ट डीप ब्ल्यू या नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सार्वजनिक शौचालये, तेथील अस्वच्छता व उपायांबाबत भायखळा येथील साबू सिद्दिक महाविद्यालयाचा प्रकल्प नावीन्यपूर्ण ठरला. महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी अजय उपाध्याय आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या प्रकल्पाने २५ हजार रुपये व चषक असे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

पहिला क्रमांक एनएमआयएस मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाला. रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भातील उपायांच्या प्रकल्प त्यांनी सादर केला. दुसरा क्रमांक एसआयईएस ग्रॅज्युएट स्कूल आॅफ टेक्नॉलॉजीला मिळाला. त्यांनी प्लॅस्टिक कचरा नियोजनाचा प्रकल्प सादर केला. स्पर्धेत अभियांत्रिकीच्या २४ महाविद्यालयांमधील २५०हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.सेन्सरकडून असे करण्यात येणार मार्गदर्शनअजय उपाध्याय याने सांगितले की, पहिला सेन्सर सुरू झाल्याने व्यक्ती शौचालयात प्रवेश करताच, बाहेर पडताच त्याने शौचालयातील दिवे, पंखा, पाण्याचा नळ बंद केला का, याची माहिती मिळेल.दुसºया सेन्सरमुळे शौचालयातील विविध गॅसेसचे प्रमाण माहिती होण्यास मदत होते. ते प्रमाणाहून अधिक असल्यास शौचालयाबाहेरील लाल दिवा लागतो आणि ते वापरण्यास अयोग्य आहे, हे समजते. गॅसेसची पातळी प्रमाणात आल्यावर दिवा बंद होतो.तिसरा सेन्सर शौचालयाच्या टाकीतील पाण्याची पातळी आणि त्यासाठी आवश्यक साठ्याविषयी माहिती देतो.

टॅग्स :मुंबई