Join us

गोरेगावच्या नेस्को विलगिकरण केंद्रात २६०० बेडच्या विलगिकरणाची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:23 PM

आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांनी केली पाहणी

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव (पूर्व) पश्चिम दुर्तगती महामार्गावरील येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या  कोरोना काळजी केंद्र २ ची  मुंबई उपनगरचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यानो आज दुपारी पाहणी केली.

 पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ मोठे प्रदर्शन सभागृह आहेत.या सर्व  सभागृहांचं रूपांतर आता विलगिकरण कक्षात करण्यात येतं आहे. हे संपूर्ण केंद्र एकूण २६०० खाटांच्या क्षमतेचं असणार आहे.याठिकाणी प्राणवायू ची सुविधा असणाऱ्या सुमारे २००० खाटा असतील.  महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहेत.येथे ठेवण्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून येथे  विविध मदत कक्ष देखील बनवण्यात येत आहेत. ज्यामध्ये चौकशी कक्ष,निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय तपासणी असे विविध कक्ष असतील.याठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. ३०० खाटा डायलेसिस व अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येतील. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर या तयारीबाबत अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केल. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई