सप्टेंबरमध्ये ४०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:47 AM2019-05-09T06:47:04+5:302019-05-09T06:47:32+5:30

येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे.

In September, the 400 Shivshahi ST camp will be launched | सप्टेंबरमध्ये ४०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

सप्टेंबरमध्ये ४०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

Next

मुंबई : येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे.
गणपतीला गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीला अतिरिक्त सुविधा पुरविण्यासाठी नवीन शिवशाही उपयोगी पडतील. शिवाय हंगामाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून दुप्पट-तिप्पट भाडे आकारणी केली जाते. या काळात एसटी महामंडळाकडून अधिक बसेस चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाºयांनी दिली.

२५० अश्वशक्ती इंजिन क्षमता

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १ हजार ३१ शिवशाही आहेत. पैकी ५३१ भाडे तत्त्वावर आणि ५०० स्वमालकीच्या आहेत. एकूण १४० शिवशाही नादुरुस्त आहेत. त्या लवकरच सेवेत येतील. सप्टेंबरपासून ४०० शिवशाही टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. या गाड्यांची इंजीन क्षमता २५० अश्वशक्ती असेल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

Web Title: In September, the 400 Shivshahi ST camp will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.