शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:42 PM2022-06-21T17:42:16+5:302022-06-21T19:16:20+5:30

Sanjay Raut : 2 आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Serious allegations of Sanjay Raut beating two Shiv Sena MLAs in Gujarat | शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Next

मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. दोन आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गुजरातमध्ये ऑपरेशन लॉट्सच्या गुंडांनी अपहरण केल्याचं राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. 

ईडीची नोटीस आम्हाला देखील आली, पण आम्ही पक्ष सोडला नाही. मला तर सरकार पाडण्यासाठी इतक्या धमक्या आल्या, पण मी डगमगलो नाही. नितीन देशमुख यांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पावसात रस्त्यावर आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण करून हॉटेलात नेले. तर कैलास पाटील यांनी आपली सुटका करून घेतली ५ ते ६ किमी चालत आले आणि कशीबशी मुंबई गाठली. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करुन त्याठिकाणी नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याविरुद्ध हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच अपहरण झालेल्या आमदारांच्या मुलांनी आणि पत्नी यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली आहे.  

आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो; अनेकांनी केल्या तक्रारी; संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Serious allegations of Sanjay Raut beating two Shiv Sena MLAs in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.