- मनीषा म्हात्रे मुंबई : लॉकडाऊनमुळे कामाठीपुरा, ग्रॅण्ट रोड, भांडुप सोनापूर, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडीसारख्या विविध रेड लाइट विभागांत राहणाऱ्यादेहविक्री करणाऱ्या महिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जगण्याचा संघर्ष अधिकच बिकट झाला. अशा वेळी काही जणींसाठी कोविड सेंटर आधार बनले. येथे काम करून काही देहविक्री करणाऱ्या महिला आणि बारगर्ल्स चरितार्थ चालवत आहेत.
कामाठीपुरा येथील सेक्स वर्कर महिलेच्या म्हणण्यानुसार, मास्क लावला तर ग्राहक घाबरतात. ते मास्क लावून आले की आम्ही घाबरतो.मात्र पर्याय नाही. कोरोनोपेक्षा पोटाची भूक महत्त्वाची आहे. दुसरीकडे घाटकोपरमधील काही तरुण बारगर्ल्स, महिला कोविड सेंटरमध्ये काम करीत आहेत. यापैकी काही जणी दिवा तर काही वाशी भागात काम करीत आहेत. येथे काम करणाºया ३० वर्षीय नेहाच्या (नावात बदल) म्हणण्यानुसार, प्रशासनाने किमान अशा स्वरूपात तरी रोजगार उपलब्ध करून दिला तर मदत होईल.
भाघरड्यासाठी तगादा
विक्रोळी पार्क साईट परिसरात राहणाºया कर्नाटकच्या रेश्मा (नावात बदल) नोकरीच्या शोधात मुंबईत आल्या आणि वेश्याव्यवसायात अडकल्या. त्यातच खांद्यावर दोन मुलांचा जबाबदारी आली. लॉकडाऊनमुळे कोरोनापेक्षा भुकेने मरण्याची वेळ ओढावल्याने अनेक संकटांवर मात करीत त्यांनी कसेबसे गाव गाठले. मात्र गावातही तीच परिस्थिती.
शेवटी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. पण आधी घरभाडे द्या, नंतरच चावी देईन, असे घरमालकाने सांगितले. सर्व सामान घरात अडकून पडले आहे. किमान सामान मिळाले असते तर रस्त्यावर चूल मांडली असती, असे त्यांनी हताशपणे सांगितले. तर, घरभाडे द्यायला पैसे नाहीत. गावी जायचे ठरविले तर आता प्रवासासाठीही पैसे नाहीत, अशी खंत गॅ्रण्ट रोड येथील बारगर्ल तरुणीने व्यक्त केली.
भाजीविक्रीची वाट बेतली जीवावर रोजगार नाही. थकलेले घरभाडे, त्यातच तीन मुलांची भूक कशी भागवायची? या काळजीने त्रस्त घाटकोपरमधील ४० वर्षीय वीरांगणा महिलेने घरातील काही सामान विकून भाजी विक्री सुरू केली. दरम्यान, तिला कोरोना झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याने मुले अनाथ झाली.
कोविड चाचण्या गरजेच्या : या महिलांसाठी काम करणाºया घाटकोपरच्या लता माने यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या महिलांच्या कोविड चाचण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीचे तीन महिने मदतीचे हात पुढे आले, आम्हीही शक्य तेवढी मदत करीत आहोत. मात्र, जूनपासून ही मदत बंद झाली.
अनेकींना आधार घरकामाचा
अनलॉकनंतर काही जणींनी घरकाम शोधले. सध्या अनलॉकमुळे काही ठिकाणी घरकाम मिळत असल्याने आर्थिक मदत होत असल्याचे गोवंडीतील एकादेहविक्री करणाऱ्या महिलेने सांगितले.
भाजीविक्रीची वाट बेतली जीवावर
रोजगार नाही. थकलेले घरभाडे, त्यातच तीन मुलांची भूक कशी भागवायची? या काळजीने त्रस्त घाटकोपरमधील ४० वर्षीय वीरांगणा महिलेने घरातील काही सामान विकून भाजी विक्री सुरू केली. दरम्यान, तिला कोरोना झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याने मुले अनाथ झाली.
जेवणासोबतच मार्गदर्शनही
साई संस्थेचे विनय वस्त यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कामाठीपुरामध्ये ३ हजार, फत्ते बाबुराव मार्ग येथे दीड हजार, पाववाला स्ट्रीट येथे तीनशे, तर ग्रॅण्ट रोडमध्ये सुमारे अडीचशेच्या आसपास देहविक्री करणाऱी महिलांसहमहिला आहेत. संस्थेच्या प्रतिनिधींच्या पुढाकारामुळे येथे दोन वेळचे जेवण देण्यासोबतच त्यांना कोविडबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यामुळे सलग ११४ दिवस कामाठीपुरासारख्या परिसरात दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला.