Join us  

रोडपालीच्या रस्त्यावर एनएमएमटीची सेवा

By admin | Published: June 17, 2014 1:14 AM

कळंबोलीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रोडपाली परिसरातील रहिवाशांसाठी तळोजा लिंक रोड मार्गे खास एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात आली आहे

रवींद्र गायकवाड, कामोठेकळंबोलीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रोडपाली परिसरातील रहिवाशांसाठी तळोजा लिंक रोड मार्गे खास एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. कळंबोली ते घणसोली अशी ही १९ क्रमांकाची बस असून त्यामुळे रहिवासी आणि आणि पोलिसांची पायपीट थांबणार आहे. या बसमुळे आता कळंबोली जंक्शनकडे न जाता थेट पुरुषार्थ पंपाजवळ निघता येणार आहे. त्यामुळे पैसे आणि वेळेत बचत होणार असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एनएमएमटीकडून करण्यात आले आहे.सिडकोने विकसित केलेल्या कळंबोली नोडचा विस्तार मोठा आहे. काही सेक्टर हे पनवेल सायन महामार्गालगत असले तरी नव्याने विकसित झालेल्या रोडपाली परिसरात अनेक सेक्टरचा समावेश आहे. या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रशस्त रस्तेही आहेत. मात्र महामार्ग, बस आणि रेल्वेस्थानक दूर असल्याने ते गाठण्यासाठी अंतर्गत वाहतुकीची सोय नाही. उरण-कळंबोली ही ३० नंबरची बसही डी मार्टपर्यंत येत असल्याचा त्याचा सेक्टर २० आणि तळोजा लिंक रोडलगतच्या रहिवाशांना कोणताच फायदा होत नाही. त्यांना ही बस पकडण्यासाठी थेट डी मार्ट गाठावे लागते. त्याचबरोबर मुंब्रा महामार्गावरून कळंबोली जंक्शनकडे जाते आणि तेथून वळण घेत पनवेल-सायन किंवा वाशीकडे जाणाऱ्या बस पकडण्यासाठी रहिवाशांना कळंबोली वसाहत किंवा कामोठा बस स्टॉप गाठावा लागतो. अनेकदा रिक्षाचा आधार घ्यावा लागतो मात्र मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, रिक्षाचालक मनाला वाटेल ते भेट घेत असल्याने खिशाला कात्री बसत होती. या सर्व गोष्टींचा विचार करून रोडपाली तळोजा लिंकमार्गे एनएमएमटी बस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.